THE LOVE BETWEEN CRICKETER AND CRICKET
Once in a lifetime, we all dreamed to be a cricketer. खरोखरच हे वाक्य भारतीय मुलांसाठी 100% खर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सोसायटी पासून स्टेडिअम पर्यंत कित्येक क्रिकेटप्रेमी आपणास दिसतात. क्रिकेट, मग ते टीव्ही वरील असो किंवा प्रत्यक्ष खेळायचे तो भारतीय लोकांच्या जीवनातला आता एक अविभाज्य भागच बनला आहे. रिव्हर्स स्विप, हेलीकॉप्टर शॉट असे फटके इंटरनैशनल सामन्यांत आले की ते गल्ली क्रिकेटमध्ये यायलाही वेळ लागत नाही. सचिनची शतक केल्यानंतर आकाशाकडे पाहण्याची शैली, शोएब अख्तरची विकेट घेतल्यानंतर दोन्ही हात लांब करून धावण्याची आणि आता तर विराट कोहलीची हेअरस्टाइल देखील क्रिकेटप्रेमी कॉपी करताना दिसतात. स्लोअर बॉल, गुगलीच्या नवीन पद्धती यांचे देखील अनुकरण होताना दिसते.
या सर्व गोष्टी आपण आयुष्यभर पाहत असतो एंजॉय करत असतो. ज्यांना जास्त आवड असते ते क्रिकेट अकादमी लावून अधिक चांगले क्रिकेट जगू पाहतात. गल्ली क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट यांतील फरक त्यांना समजतो. क्रिकेटसाठी लागणारी मेहनत, फुटवर्क यांची त्यांना माहिती होते. हे खेळाडू वयाच्या ठराविक कालावधीत अकादमी मध्ये खेळत राहतात. बरेच दहावी, बारावीच्या करिअरच्या महत्त्वाच्या वर्षांत क्रिकेटपासून लांब राहताना दिसतात. प्रोफेश्नल कोर्सच्या काळातही म्हणावे तसे क्रिकेट खेळता येत नाही आणि एकदा व्यवसायिक आयुष्य सुरु झाले की क्रिकेट खेळणे स्वप्नवतच होऊन जात.
खरचं एकदा कॉलेजच वय संपत आलं की किती अवघड असतं अशा आवडी जोपासन. लहानपणी परीक्षा आली की बाबा क्रिकेट खेळू देत नाहीत आणि मोठेपणी आपण करिअरच्या मागे लागतो. दोन्ही घटनांची वेळ वेगळी असली तरी परिणाम एकच तो म्हणजे क्रिकेटपासून दूर रहावे लागणे. किती अवघड असत ना क्रिकेटपासून दूर रहाण. आजही मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांना खेळामध्ये करिअर करण्याबाबत नकारच दिला जातो. क्रिकेट हा श्रीमंत लोकांचा खेळ असे त्यांना ऐकावे लागते. तस पहायला गेल तर ते खर देखील आहे. क्रिकेटचे समान, अकादमी आदींवरती होणारा खर्च पाहता खरच क्रिकेटमध्ये करिअर करण सोपं नाही.
परंतु एवढं सगळं माहिती असून देखील क्रिकेट हे मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. आजही ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही ते छंद म्हणून खेळताना दिसतात किंवा टीव्हीवरती सामन्यांचा आनंद घेतात. परंतु हे वरवरती कितीही दिसत असल तरीही त्यांच्या मनात कुठेतरी दबलेल क्रिकेटर होण्याच स्वप्न हे असतच आणि ते पूर्ण न झाल्याच दुःख देखील. आज असे खूप लोक हे दुःख घेऊन जगत आहेत. ज्यांनी कुटुंब, करिअर यांसाठी क्रिकेटचा त्याग केला आहे. परंतु व्यवसायिक नाही तर छंद म्हणून तरी यांमधील प्रत्येकाने खेळाचा आनंद घ्यावा. आपणही अशा लोकांना प्रोत्साहन दिल पाहिजे जे त्याच्यांसाठी खूप गरजेचं आहे. आणि माणुसकी म्हणून आपण तेवढ नक्कीच करू शकतो.
Let every cricketer feel the love between him and cricket.
Dr. Dhairyashil Patil
+91-8983301830
dhairyashilpatil10.blogspot.com
dhairyashilpatil111@gmail.com
शुभेच्छा
ReplyDeleteHey Dhairyasheel .....nice yaar....one should always treasure there hobby😊
ReplyDeleteDhairyasheel it's very nice . Keep it bro . . .it's truly fabulous writing
ReplyDeleteTruly wonderful 😍 emotions well expressed🙌
ReplyDeleteMast....
ReplyDelete