Tuesday, 21 April 2020

COVID 19 - AYURVEDIC PERSPECTIVE

      COVID 19 - AYURVEDIC PERSPECTIVE 





    आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने आपला प्रादुर्भाव दाखवून दिला आहे. व्हायरसच्या mutations मुळे त्यावरती लस शोधने कठिन आहे असे संशोधकांचे उत्तर आहे. तरी याविषयी आपण आयुर्वेदामध्ये काय विचार होऊ शकतो हे पाहुयात. 

    सध्या तरी वास्तविक स्थिती पाहता निदान करुन नंतर चिकित्सा करने यापेक्षा जे रुग्ण कोरोना तपासणीमध्ये पॉजिटिव्ह आले आहेत त्यांच्या चिकित्सेचा विचार करने जास्त सयुक्तिक राहील. 

   इंफेक्शन नंतर 14 दिवसामध्ये लक्षणे दिसायला सुरुवात होते. हा व्हायरस स्थिर गोष्टिवरती जास्त काल राहतो. त्याचा आकर देखील इतर  व्हायरसपेक्षा तुलनेने मोठा आहे. रुग्णामधे दिसणारी खोकला, अंगगौरव, आदि लक्षणे कफज वाटत आहेत. त्यानुसार या व्याधिचा विचार कफज विष प्रमाणे केला जाऊ शकेल. परंतु खोकला हा कोरडा असल्याने येथे वाताचा विचार करणे देखील गरजेचे आहे. वात कफज सन्निपात असा विचार करणे योग्य राहील. 

    चिकित्सा करताना व्याधिच्या आशुकारित्वाचा विचार करणे सर्वात जास्त गरजेचे वाटते. त्यामुळे प्रथम रस औषधी वापरने जास्त सयुक्तिक राहील. शुष्क कास आणि ज्वर याचा विचार करता मल्लसिंदूर वापरने योग्य वाटते. परंतु त्याच्या तीक्ष्णत्वाचा विचार करुण पित्त प्रकृतिमध्ये काळजी घ्यावी. या कल्पामध्ये सोमल असल्याने याचा वापर ज्वरास निमित्त असणारे जंतुंचा नाश करण्यासाठी  तसेच याचा उपयोग हा फुफ्फुस व इतर कफ स्थानावरती होत असल्याने कोरोना इंफेक्शनमध्ये मल्लसिंदूर उपयोगी ठरू शकते.

    यासोबत लक्ष्मीविलास गुटीचा उपयोग करता येईल. श्वसनक व श्लेष्मक सन्निपातामध्ये याचे उत्तम कार्य होते. कोरोना हा वटवाघुळामधून माणसामध्ये आला असे मानले जाते त्यामुळे त्यावर प्राणिज विषाचा विचार करुण वनस्पतिज विष चिकित्सेमध्ये वापरने योग्य वाटते. म्हणून लक्ष्मीविलास मधील धोतरा बिजचा येथे वापर होऊ शकतो. 

    द्रव्य चिकित्सेमध्ये महासुदर्शन चुर्णचा वापर येथे ज्वर नाशक म्हणून केला जावू शकेल. फलश्रुतिमध्ये आल्या प्रमाणे याचा वापर त्वरित ज्वर कमी करण्यासाठी केला जावू शकतो. तसेच आधुनिक शास्त्रानुसार या व्याधिमध्ये हेमोग्लोबिनची ऑक्सिजन पुरावन्यची क्षमता कमी होते त्यानुसार औषधी सोबत अनुपान देताना रक्तपाचक क्वाथ देता येईल. याने संभवतः रुग्णास ऑक्सिजन पुरवठा योग्य रितिने होण्यास मदत होईल.

    पंचकर्म किंवा चिकित्सा करताना वैद्यने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. कक्षाचे रक्षोघ्न धुपाने (गुग्गुल, कर्पूर, आदि) धूपन करने गरजेचे आहे. रुग्ण बाघताना आवश्यक ते मास्क आदि वापरने कधीही चांगले. सोबत कपूर, वचा, हरिद्रा यांचा लेप है कंठ व उर प्रदेशी लावणे देखील सुरक्षित राहन्यास मदतीचे होईल. रुग्ण बरा करण्यासोब वैद्याने स्वतः सुरक्षित राहणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

    कनकासवचा वापर आधी संगीताल्यानुसार वनस्पतिज विष तसेच वात कफज सन्निपाताचा विचार करुन करता येईल. एकदा श्वसन मार्गामध्ये अडकुन रहिलेला कफ बाहेर निघाला की बरीचशी लक्षणे कमी होण्यास मदत होईल. ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थित झाल्यानंतर रुग्णास दिसनारी अशक्तपाना, दम लागने, श्वास घेताना त्रास होने अशी लक्षणे कमी होतील.

    ज्वर कमी आल्यानंतर पुन्हा येऊ नये यासाठी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जीर्ण ज्वरामध्ये लेले संशमनी वटी उपयोगी ठरू शकते. तसेच रस औषधी वापरणे आवश्यक वाटत असेल तर ज्वरमुरारी रस जो पुराण ज्वर, विषम ज्वर अथवा सेंद्रिय विषारामुळे ज्वर शरीरामध्ये टिकून राहणे या कारणासाठी आलेला आहे तो वापरने योग्य राहील.

   याप्रकरे कोरोना चिकित्सा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खुप निरनिराळी औषधे वापरता येऊ शकतात फक्त या व्याधिचा आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करने गरजेचे आहे. ज्याप्रमाणे केरलमधे आयुर्वेदाचा उपयोग करुण कोरोना वरती नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे तसे नक्कीच महाराष्ट्र व संपूर्ण भारतामध्ये करता येणे शक्य आहे. गरज आहे फक्त आपणास संधी मिळेल तर त्याचा योग्य वापर करण्याची.


1. मल्लसिंदूर

2. लक्ष्मीविलास रस

3. महासुदर्शन चूर्ण (अथवा महासुदर्शन घन वटी )

4. कनकासव

5. संशमनी वटी 

6. ज्वरमुरारी रस

7. रक्तपाचक क्वाथ 

8. समीरपन्नाग रस

 

    आशा प्रकारे वरील आठ औषधी वापरून कोरोना बाधित रुग्णामध्ये चिकित्सा करणे फलदायी ठरू शकते. 


जय आयुर्वेद ।


वै. धैर्यशील पाटील 

+91-8983301830

dhairyashilpatil111@gmail.com


Monday, 5 December 2016

THE LOVE BETWEEN CRICKETER AND CRICKET

THE LOVE BETWEEN CRICKETER AND CRICKET


    Once in a lifetime, we all dreamed to be a cricketer. खरोखरच हे वाक्य भारतीय मुलांसाठी 100% खर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सोसायटी पासून स्टेडिअम पर्यंत कित्येक क्रिकेटप्रेमी आपणास दिसतात. क्रिकेट, मग ते टीव्ही वरील असो किंवा प्रत्यक्ष खेळायचे तो भारतीय लोकांच्या जीवनातला आता एक अविभाज्य भागच बनला आहे. रिव्हर्स स्विप, हेलीकॉप्टर शॉट असे फटके इंटरनैशनल सामन्यांत आले की ते गल्ली क्रिकेटमध्ये यायलाही वेळ लागत नाही. सचिनची शतक केल्यानंतर आकाशाकडे पाहण्याची शैली, शोएब अख्तरची विकेट घेतल्यानंतर दोन्ही हात लांब करून धावण्याची आणि आता तर विराट कोहलीची हेअरस्टाइल देखील क्रिकेटप्रेमी कॉपी करताना दिसतात. स्लोअर बॉल, गुगलीच्या नवीन पद्धती यांचे देखील अनुकरण होताना दिसते.
     या सर्व गोष्टी आपण आयुष्यभर पाहत असतो एंजॉय करत असतो. ज्यांना जास्त आवड असते ते क्रिकेट अकादमी लावून अधिक चांगले क्रिकेट जगू पाहतात. गल्ली क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट यांतील फरक त्यांना समजतो. क्रिकेटसाठी लागणारी मेहनत, फुटवर्क यांची त्यांना माहिती होते. हे खेळाडू वयाच्या ठराविक कालावधीत अकादमी मध्ये खेळत राहतात. बरेच दहावी, बारावीच्या करिअरच्या महत्त्वाच्या वर्षांत क्रिकेटपासून लांब राहताना दिसतात. प्रोफेश्नल कोर्सच्या काळातही म्हणावे तसे क्रिकेट खेळता येत नाही आणि एकदा व्यवसायिक आयुष्य सुरु झाले की क्रिकेट खेळणे स्वप्नवतच होऊन जात.
      खरचं एकदा कॉलेजच वय संपत आलं की किती अवघड असतं अशा आवडी जोपासन. लहानपणी परीक्षा आली की बाबा क्रिकेट खेळू देत नाहीत आणि मोठेपणी आपण करिअरच्या मागे लागतो. दोन्ही घटनांची वेळ वेगळी असली तरी परिणाम एकच तो म्हणजे क्रिकेटपासून दूर रहावे लागणे. किती अवघड असत ना  क्रिकेटपासून दूर रहाण. आजही मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांना खेळामध्ये करिअर करण्याबाबत नकारच दिला जातो. क्रिकेट हा श्रीमंत लोकांचा खेळ असे त्यांना ऐकावे लागते. तस पहायला गेल तर ते खर देखील आहे. क्रिकेटचे समान, अकादमी आदींवरती होणारा खर्च पाहता खरच क्रिकेटमध्ये करिअर करण सोपं नाही.
     परंतु एवढं सगळं माहिती असून देखील क्रिकेट हे मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. आजही ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही ते छंद म्हणून खेळताना दिसतात किंवा टीव्हीवरती सामन्यांचा आनंद घेतात. परंतु हे वरवरती कितीही दिसत असल तरीही त्यांच्या मनात कुठेतरी दबलेल क्रिकेटर होण्याच स्वप्न हे असतच आणि ते पूर्ण न झाल्याच दुःख देखील. आज असे खूप लोक हे दुःख घेऊन जगत आहेत. ज्यांनी कुटुंब, करिअर यांसाठी क्रिकेटचा त्याग केला आहे. परंतु व्यवसायिक नाही तर छंद म्हणून तरी यांमधील प्रत्येकाने खेळाचा आनंद घ्यावा. आपणही अशा लोकांना प्रोत्साहन दिल पाहिजे जे त्याच्यांसाठी खूप गरजेचं आहे. आणि माणुसकी म्हणून आपण तेवढ नक्कीच करू शकतो.
    Let every cricketer  feel the love between him and cricket.
 
                Dr. Dhairyashil Patil
                 +91-8983301830
     dhairyashilpatil10.blogspot.com
     dhairyashilpatil111@gmail.com